हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Constipation Home Remedy) रोजच्या बिघडत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर दिवसेंदिवस वाईट परिणाम होऊ लागला आहे. एकीकडे कामाचा ताण आणि दुसरीकडे चुकीचे अन्नपदार्थ खाण्याच्या सवयी. यामुळे अपचन, पोटाच्या समस्या, आतड्यांमध्ये सूज, फूड पॉयझन, पचनाचे विकार आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात वाढती उष्णता बद्धकोष्ठतेसारखे त्रास वाढवते. तुम्हीही अशा समस्येने हैराण झाले असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे.
खास करून उन्हाळ्याच्या दिवसात बद्धकोष्ठतेचा त्रास प्रचंड वाढतो. अशावेळी त्वरित आराम हवा असेल तर कोणतीही औषधे खाण्यापूर्वी घरगुती उपायांचा अवलंब करावा. यामध्ये सब्जा खाणे अत्यंत प्रभावी मानले जाते. (Constipation Home Remedy) त्यामुळे जर तुमचीही पचनक्रिया खराब असेल आणि तुम्हाला तुमचे पोट साफ करण्यात त्रास होत असेल तर सब्जाचे बी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सब्जा बी नैसर्गिक उपचार पद्धतीने आपले पोट साफ करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. शिवाय यातील अनेक आरोग्यदायी गुणधर्म फायदेशीर आहेत. ते कसे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
सब्जा बीमधील आरोग्यदायी गूण
(Constipation Home Remedy) सब्जाच्या बियांमध्ये उच्च फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारखे चांगले घटक असतात. जे तुमची पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून त्वरित आराम मिळण्यास मदत करतात.
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सब्जा बी चे सेवन कसे कराल?
बद्धकोष्ठतेवर उपचार म्हणून सब्जा बी चे सेवन करायचे असेल तर यासाठी रात्री सब्जा बियाणे खाणे उत्तम ठरेल. याकरता सब्जाच्या बिया पाण्यात भिजत ठेवा. ज्यामुळे त्या फुगतील. (Constipation Home Remedy) या बियांचे सेवन दुधासोबत किंवा पाण्यासोबत करता येईल. तसेच सब्जा बी रात्री भिजवून खाल्ल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही सब्जा बी सकाळी रिकाम्या पोटीही घेऊ शकता.
सब्जा बी खाल्ल्याने होणारे फायदे (Constipation Home Remedy)
सब्जाच्या बियांमध्ये असलेले फायबर हे पोटाच्या सर्व समस्यांवर परिणामकारक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय अपचन दूर करण्यास मदत होते. शिवाय सब्जा बी थंड असल्याने त्याचे सेवन केल्यास उष्णतेपासून पोटाला आराम मिळतो. इतकेच नव्हे तर आतड्यांना सुखद अनुभव मिळतो. ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते.