पोलिसांच्या घराचे प्लॅस्टर करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगारांचा मृत्यू

0
87
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

 

औरंगाबाद | पोलिसाच्या घराचे प्लास्टर करत असताना दुसर्‍या मजल्यावरून पडल्यामुळेच गंभीर जखमी झालेल्या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पडेगाव येथील मीरानगरात उघडकीस आली. याविषयी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  गणेश शिवाजी झिलमेवाड ( 40 रा. छत्रपती नगर सातारा परिसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

पोलीस हवालदार विनायक शिंदे यांनी घराच्या बांधकामाचा ठेका बाबासाहेब डगळे यांना दिला आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीचे प्लास्टर करण्यासाठी  बाबासाहेब येणी झिलमेवाड यांना आणले होते. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ते लाकडी फळीवर प्लास्टर करण्यासाठी उभे असताना त्यांचा तोल गेला आणि ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले.

 

त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखम झाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी घाटी रुगणालयात त्यांना दाखल केले असता.  डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हवालदार सुधीर पाटील हे या घटनेचे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here