टीम हॅलो महाराष्ट्र । गेल्या डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये महागाईचा दर २.११ टक्के होता तर नोव्हेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के राहिला. मात्र गेल्या एका महिन्यात महागाई दारात १.८१ टक्के वाढ झाली असून वर्षाकाठी चलनवाढीचा दर सुमारे ५.२४ टक्क्यांनी वाढला आहे.
नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर ५.५४ टक्के इतका होता
जुलै २०१६ नंतर मागचा डिसेंबर महिना हा पहिला महिना आहे ज्यावेळी महागाईच्या दराने रिझर्व्ह बँकेची अप्पर लिमिट (२-६ टक्के) ओलांडली आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई ४.६२ टक्के इतकी होती, ती नोव्हेंबरमध्ये वाढून ५.५४ टक्क्यांवर गेली. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. डिसेंबरमध्ये अनेक आठवडे कांदा १५० रुपयांपर्यंत विकला जात होता. सध्या कांद्याचा बाजारभाव अजूनही ६० रुपये किलोच्या जवळपास आहे. महागाईवाढीला कांद्याचे वाढलेले दर हा महत्वाचा घटक कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
अन्नधान्य चलनवाढ १४.१२ टक्क्यांवर पोहोचली आहे
आकडेवारीनुसार, अन्नधान्य चलनवाढ १ डिसेंबरमध्ये १४.१२ टक्के झाली. नोव्हेंबरमध्ये ती १०.०१ टक्के इतकी होती. केंद्र सरकारने महागाई दर ४ टक्के राहणार असल्याचे रिसर्व्ह बँकेला सांगितले आहे.
Government of India: Consumer inflation rises to 7.35% in December 2019 as compared to 5.54% in previous month pic.twitter.com/xMcEa5io8k
— ANI (@ANI) January 13, 2020