कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील मंगळवार पेठेत पिण्याचे पाणी दूषित येत असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा शहरातील पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकरी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार पेठेतील कन्याशाळे जवळील मी स्थानिक रहिवाशी असुन, गेले 15 दिवस गटारीचे व पाईपलाईनचे काम झाले आहे. परंतू पिण्याचे पाणी दुषित असुन लोकांना त्याचा होतो. सध्या कराड मध्ये चिकन गुणिया व डेंग्युची साथ आहे. त्यामुळे पाण्याचा नमुना तपासुन स्वच्छ पाणी देण्यात यावे. तसेच कराड नगरपालिकेने कोरोना व चिकन गुणिया व डेंग्यु ही परिस्थिती पाहता वरचेवर औषध फवारणी, पावडर, फिनेल मारण्यात यावे, ही सर्व नागरिकांची मागणी आहे.
कराड शहरामधील मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या गणेशोत्सव सुरु असून, नवरात्र उत्सव जवळ आले असून, मोकाट कुत्र्यांपासून धोका आहे. अनेक लहान मुलांना व वयोवृध्दांना, महिलांना मोकाट कुत्री जास्त प्रमाणात असलेमुळे अनेक जणांना चावा घेतलेला आहे. तरी याचा नगरपालिकेने नियमाप्रमाणे योग्य तो बंदोबस्त करावा.