मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; भाजप आमदाराला अटक

0
37
BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. टी. राजा यांच्या वक्तव्यानंतर हैदराबादमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरून उतरून आंदोलन करत आहे. अखेर आज सकाळी टी. राजा यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.

नेमक काय आहे प्रकरण ?

तेलंगणाचे भाजपा आमदार टी. राजा सिंह यांनी कथीतरित्या मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे संतप्त लोकांनी सांगितले.तसेच राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकणी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या. राजा यांच्या अटकेच्या मागणीसाठी डबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मीर चौका पोलिस ठाण्यांबाहेर मोठ्या संख्येने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टी.राजा सिंह हे भाजपाचे हैदराबादमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यांसाठी ओळखले जातात . यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारूकी यांना देखील धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी त्याला पोलिस कोठडीही घेण्यात आली होती