चित्रपटाच्या टायटलवरून पेटला वाद; अक्षय कुमारचा पुतळा जाळून विरोधकांनी व्यक्त केला संताप

Akshay Kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट पृथ्वीराज सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज ‘या चित्रपटाला चंदिगढमध्ये भयंकर विरोधास सामोरे जावे लागत आहे. दरम्यान क्षत्रिय महासभेने या चित्रपटाच्या नावास कडकडून विरोध करीत त्यावर आक्षेप घेतला आहे. जोधा-अकबर, पद्मावत सारख्या चित्रपटांच्या नांवांविषयीचा वाद तुम्हाला माहीत असेलच. तर आता अशाच प्रकारचा आणखी एक वाद पुन्हा एकदा उदभवण्याची शक्यता आहे. अक्षय कुमार आणि यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटावर आता या संघटनेने प्रश्न उठविले आहेत आणि नव्या वादाचा पायंडा घातला आहे. इतकेच नव्हे तर अक्षय कुमारचा पुतळा जाळून ठिणगी टाकण्यात आली आहे.

पंजाबमधील चंदिगढमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या उपस्थितीत ‘पृथ्वीराज’ या आगामी बॉलिवूड चित्रपटाविरोधात जोरदार प्रदर्शन करण्यात आली आहेत. यावेळी अक्षय कुमारचा पुतळा बनवून आणलेला होता. शिवाय संतप्त विरोधकांनी अक्षय कुमारचा पुतळा जाळला आहे आणि आपला विरोध दर्शविला आहे. संघटनेच्या लोकांची मागणी अशी आहे की, चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव बदलून ‘हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान’ असे करण्यात यावे. कारण पृथ्वीराज चौहान हे शेवटचे हिंदू सम्राट होते. त्यामुळे त्यांचे नाव हे सन्मानपूर्वकच घेतले पाहिजे.

दरम्यान या संघटनेची आणखी एक मागणी आहे की, चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर हा चित्रपट एकदा राजपूत आणि क्षत्रिय समाज प्रतिनिधींना दाखवायला हवा, म्हणजे त्यांना चित्रपटात काही विवादास्पद आहे का ते आधीच समजेल. शिवाय या चित्रपटामध्ये इतिहासाशी छेडछाड केली असेल तर अगोदर समोर येईल आणि त्यास विरोध करून ते दृश्य हटवता येईल. या सर्व प्रकारानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा पृथ्वीराजच्या सेटवर परतला आहे आणि त्याने चित्रपटाची शुटींग पुन्हा सुरु केली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार आहे.