Whatsapp Stickers मध्ये कन्व्हर्ट करा स्वतःच्या आवडीचे फोटो; कसे ते आम्ही सांगतो

Whatsapp Stickers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp मध्ये लोक एकमेकांशी चॅटिंग करतात, त्यावेळी आपली क्रिया- प्रतिक्रिया ते देत असतात. चॅटिंग करताना तेच तेच स्टीकर पाठवून लोक कंटाळतात. मात्र आता लोकांना नवनवीन स्टिकर्स पाहायला मिळणार आहेत. तेच तेच स्टिकर्स पाठविण्याची आता आवश्यकता नाही. कारण आता तुम्ही तुमचे आवडीचे फोटो व्हाट्सअप स्टिकर्समध्ये कन्व्हर्ट करू शकता. यामुळे चॅटिंग करताना आणखी मजा येणार हे नक्की. यासाठी काय प्रोसेस आहे ते जाणून घेऊयात.

अशाप्रकारे बनवा स्टिकर्स –

सगळ्यात अगोदर स्टिकर ट्रे उघडा आणि स्टिकर तयार करा.
तुमच्या गॅलरीमधून कोणताही फोटो किंवा सेल्फी वा पाळीव प्राणी, मित्राचा फोटो निवडा.
तुम्ही स्वत:मधील कलाकार जागा करून कलात्मकदृष्ट्या तंत्रज्ञान वापरून वेगळा स्टीकर तयार करा.
तो फोटो कटआउट टूल वापरून परस्पेक्टीव्ह व इमेजचा आकार न बदलता कट करा.
तुम्ही घेतलेल्या किंवा कट केलेल्या इमेजमध्ये इमोजी, विविध स्टाईचे टेक्स्ट वापरा.
लेअर ऑन दि फंड झाल्यानंतर तुमचा फोटो एका स्टिकर मध्ये कन्व्हर्ट झालेला तुम्हाला दिसू शकतो.

स्टिकर पुन्हा एडीट करण्याची सोय

तुम्ही जो स्टीकर बनवला आहे, त्यात काही बदल करायचा असेल तर पूर्वी जो सेव्ह केलेला स्टीकर आहे, त्यात तुम्ही बदल करू शकता. त्यासाठी पुन्हा तुम्हाला नव्याने स्टीकर करण्याची आवश्यकता नाही. नवीन स्टीकर असू द्या किंवा पूर्वी बनवलेला स्टीकर असू द्यात, त्यात एडीट करून पुन्हा नवीन स्टीकर निर्माण करू शकता. त्या स्टिकरवर एक लॉंग प्रेस करा आणि तेथे एडीट स्टिकर म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून तो स्टिकर पुन्हा एडिट करू शकता.
iOS 17 वापरकर्त्यांसाठी स्टीकर बनविण्याचे फिचर उपलब्ध आहे. तुम्ही स्वत: स्टीकर बनवू शकला नाहीत तर मित्रांकडून बनवून घेऊ शकता. हे स्टिकर्स एकमेकांना पाठवा, शेअर करा. तुम्ही या स्टीकरव्यतिरिक्त AI जनरेटेड स्टिकर्सही वापरू शकाल.