Coolers Under 5000 : उन्हाळ्यात AC ला टक्कर देतायत ‘हे’ स्वस्त Cooler; घ्या थंड हवेचा अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Coolers Under 5000) उन्हाळा म्हटलं की, उष्ण वारे आणि त्यामुळे वाढणारा उकाडा आलाच. पण यंदाचा उन्हाळा काहीच्या काही आहे. गेल्या काही दिवसात तर तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. त्यामुळे घामाच्या धारांनी नुसता जीव नकोसा केला आहे. एकंदरच काय तर यावेळी गरमीने लोकांची अवस्था बिकट केली आहे, त्यामुळे दिवस रात्र घरातील पंखे गरगर फिरत आहेत.

अशा दिवसात घरी एसी आणि कुलर असावे असं प्रत्येकाला वाटत. त्यामुळे उन्हाळ्यात कमी बजेटमध्ये अशा उपकरणांचा शोध घेतला जातो. अशावेळी स्वस्त आणि एसीला जबरदस्त टक्कर देणारे कूलर सर्वोत्तम पर्याय ठरतात. (Coolers Under 5000) म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी ५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रूम कूलरचे काही जबरदस्त पर्याय घेऊन आलो आहेत.

1. एकवीरा हायस्पीड कुलर फॅन

एकवीरा टेबल टॉप ब्लेडलेस पोर्टेबल कूलर हा अत्यंत कमी दरात विकत घेता येईल असा कुलर फॅन आहे. जो गुळगुळीत पांढऱ्या प्रीमियम प्लास्टिकमध्ये तयार केलेला असतो. (Coolers Under 5000) हा कुलर घर तसेच ऑफिसमध्ये वापरता येईल. याची किंमत केवळ २,०९९ रुपये इतकी आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा उकाड्यात काढायची गरज नाही.

2. Crompton जिनी निओ टेबल टॉप एअर कूलर 10L

Crompton गिनी निओ एअर कूलर हा घरासाठी डिझाईन केलेला एक कॉम्पॅक्ट पॉवर हाऊस कुलर आहे. (Coolers Under 5000) हा कूलर मोटर ओव्हरलोड प्रोटेक्टरसह येतो. तसेच केवळ १३० वॅट इतका कमी वीज वापरतो. त्यामुळे वीज वाया जात नाही शिवाय बिलदेखील जास्त येत नाही. या कुलरची ऑनलाईन किंमत केवळ ३,७३० रुपये इतकी आहे. त्यामुळे खिशाला देखील परवडणारा आहे.

3. Hindware स्मार्ट उपकरणे Cruzo 25L (Coolers Under 5000)

उन्हाळ्यात एसीला उत्तम पर्याय म्हणून या 25L पोर्टेबल एअर कूलरचा तुम्ही जरूर विचार करा. कारण हा कुलर काही अधिक वीज वापरत नाही. शिवाय वीज वाया देखील घालवत नाही. इतकंच काय तर त्याच मोड्यूल डिझाईन इतकं परफेक्ट आहे की, तो घरात कुठेही बसू शकतो. या कुलरची ऑनलाईन किंमत ४,४९० रुपये इतकी आहे.

4. BAJAJ PX25 टॉर्क पोर्टेबल एअर कूलर

बजाज PX25 टॉर्क पोर्टेबल एअर कूलर हा स्वस्त आणि मस्त पर्याय ठरू शकतो. कारण हा कूलर त्याच्या अँटी- बॅक्टेरियल फिल्टर आणि टर्बो फॅन तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. (Coolers Under 5000) एकूण २४ लिटर क्षमतेचा हा कुलर आकाराने फार मोठा नसल्याने घरात कुठेही अड्जस्ट होतो. त्याची कॉम्पॅक्ट डिझाइन आणि चाके यासाठी मदतशीर ठरतात. या कुलरची ऑनलाईन किंमत केवळ ४,६४९ रुपये इतकी आहे.

5. Havells फ्रेस्को – i 32L

हॅवेल्स फ्रेस्को i32 पोर्टेबल एअर कूलर हादेखील उन्हाळ्यात एकदम बेस्ट पर्याय आहे. या कुलरचा लूक एकदम कमाल, स्टायलिश आणि मुख्य म्हणजे घरात कुठेही सहज अड्जस्ट होईल असा आहे. या कुलरची क्षमता ३२ लीटर इतकी आहे. त्यामुळे घर असो वा ऑफिस तुम्ही कुलिंगसाठी या कुलरचा आरामात वापर करू शकता. (Coolers Under 5000) आणखी एक खास बाब म्हणजे हा कूलर तुम्हाला ऑनलाईन केवळ ४,९९८ रुपयांना मिळेल. त्यामुळे हा कुलर खिशाला परवडणारा आहे.