नवी दिल्ली । पॉवर प्लांटमध्ये कोळशाची कमतरता लक्षात घेता, कोअर मॅनेजमेंट टीम (CMT) ची स्थापना करण्यात आली आहे, जी दररोज कोळशाच्या साठ्याचे बारकाईने निरीक्षण आणि व्यवस्थापन करते. ऊर्जा मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. ऊर्जा प्रकल्पांना होणार कोळशाचा पुरवठा सुधारण्यासाठी मंत्रालय कोल इंडिया लिमिटेड आणि रेल्वे यांच्यासोबत आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करत आहे.
ऊर्जा मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, “कोळसा मंत्रालय आणि कोल इंडिया लिमिटेडने आश्वासन दिले आहे की, ते पुढील 3 दिवसात वीज क्षेत्राकडे कोळसा पाठवण्याची मर्यादा दररोज 1.6 मे.टन वाढवून ते 1.7 मे.टन प्रतिदिन पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे नजीकच्या भविष्यात वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचे साठे तयार होण्यास मदत होईल. ”
मंत्रालयाने सांगितले की,”विजेची मागणी वाढण्याबरोबरच कोळशाच्या खाणींमध्ये झालेल्या पावसामुळे कोळशाचे संकट निर्माण झाले आहे.” ते म्हणाले कि, “अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनामुळे विजेच्या मागणीमध्ये झालेली अभूतपूर्व वाढ, सप्टेंबरमध्ये कोळसा खाणी भागात झालेला मुसळधार पाऊस, त्याचा कोळसा उत्पादनावर परिणाम आणि घरगुती कोळशावर अवलंबून राहणे यामुळे वीजनिर्मिती केंद्रांमध्ये आयात कोळशाच्या साठ्यांच्या किंमती वाढल्या.”
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाची कमतरता असल्याचे मान्य केली होते. त्यांनी त्याला “सामान्यतेच्या पलीकडे” असे म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी असेही सांगितले की,”ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात विजेची मागणी कमी होईल आणि प्लांट्सना होणार कोळशाचा पुरवठा देखील सुधारेल.”