कुरीअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घातला साडेचार लाखांचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | ऑनलाईन शॉपिंग पोर्टलचे उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणाऱ्या कुरीअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच उत्पादन विकून त्या द्वारे आलेली रक्कम कंपनीला न देता परस्पर लांबवत कंपनीला ४ लाख ३५ हजार ६४५ रुपयांचा गंडा घातला.

कर्नल संदिप यादव, ५२, रा. गुडगाव यांची हरियाना येथे सिस्टम लॉजिस्टिक कंपनी असून औरंगाबादच्या समतानगर मध्ये काही वर्षांपुर्वी कंपनीची शाखा उघडली. अक्ष परमेश्वर मुळे, (रा. गांधीनगर, )याला जानेवारी, २०१९ मध्ये व्यवस्थापक म्हणून तर योगेश अनिल कुलकर्णी, रा. हिंदु राष्ट्र चौक याना सहायक व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. दोघांनी सुपरवायजर म्हणून मोहित धर्मराज बुक्तारे, रितेश राजु साळवे यांना फेब्रुवारी मध्ये नियुक्त केले. परंतू दोन महिन्यात यांनी संगणमत करुन विकलेले ३ लाख ८ हजार १७५ रुपयांचे ८६ ऑनलाईन उत्पादनाचे पैसे कंपनीला दिले नाही. कंपनीत ठेवलेली १ लाख १६ हजार ८६२ रुपये देखील योगेश स्वत: घेऊन गेला, असे तक्रारीत म्हटले आहे.

कंपनीने चौघांना याप्रकरणी खुलासा मागितला असता त्यांच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याप्रकरणी क्रांतीचौक पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.