गुड न्यूज ! ‘कोरोना अँटिबॉडीचा’ शोध लावणारी पहिली टेस्ट किट पुण्यात तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भारत कोरोना व्हायरस या विषाणूजन्य आजाराशी दोन हात करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अस असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने पहिली स्वदेशी कोरोना अँटिबॉडी किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

कोविड१९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट पुण्यात तयार केली आहे. ही किट जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास मदत करेल. अस आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं.

तसेच कोरोना विषाणूवर लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत. आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था असून तिच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात येणार आहे. ही लस बनवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचे ठरणारे कार्य असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”