हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Corona Cases In Maharashtra: महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. महाभयंकर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत तब्बल २६ कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. मुंबईला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्यावर मास्क लावायची पाळी तर येणार नाही ना? याची भीती नागरिकांच्या मनात आहे.
महाराष्ट्रात एकूण १३२ रुग्ण आढळले – Corona Cases In Maharashtra
सध्या राज्यात ५६ सक्रिय रुग्ण असून, सर्व रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. या वर्षी (जानेवारी २०२५ पासून) महाराष्ट्रात एकूण १३२ रुग्ण आढळले (Corona Cases In Maharashtra) असून, त्यापैकी १२६ मुंबईतील आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या चाचणीत कोरोना व्हायरस आढळला आहे. परंतु, उल्लेखनीय म्हणजे रुग्णालय प्रशासनाच्या मते, कोविड पॉझिटिव्ह असलेल्या ५८ वर्षीय महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाला तर १३ वर्षीय मुलीचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला असं म्हंटल जातंय. तरीही दोघींच्याही शरीरात कोरोनाने शिरकाव केला होता हि गोष्ट कोणी नाकारू शकत नाही.
पुण्यात एका ८७ वर्षीय कोरोनाची लागण झाली. खूप दिवसानंतर पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलं आहे. पुणे महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. भारतात सध्या कोरोनाचे २५७ सक्रिय रुग्ण असून, केरळ (६९), महाराष्ट्र (४४), आणि तामिळनाडू (३४) मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्याचे रुग्ण प्रामुख्याने ओमिक्रॉन JN.1 आणि कोरोनाच्या उप-व्हेरिएंट्समुळे (उदा., LF.7, NB.1.8) आहेत, जे अत्यंत संसर्गजन्य मानले जातात, परंतु कमी घातक आहेत.
कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये – Pune Covid Cases
खरं तर कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये 2019 मध्ये झाली आणि 2020 मध्ये संपूर्ण जगभर हा विषाणू पसरला. भारतात तर करोडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांनी यातून स्वतःचा बचाव केला तर काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉक डाउन करण्यात आलं, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली होती. 2022 पासून जग हळूहळू पूर्वपदावर आले. परंतु आता हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे ही पुन्हा लाट येणार का अशी भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या या नव्या विषाणूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.




