Corona Cases In Maharashtra : कोरोनाचे संकट वाढलं!! मुंबई- पुण्यानंतर या 8 शहरांत रुग्ण सापडले

Corona Cases In Maharashtra (3)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Corona Cases In Maharashtra । राज्यात कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आधी फक्त मुंबई आणि पुणे शहरांत कोरोना रुग्ण आढळले होते, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा इतर शहरात सुद्धा पसरला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी फक्त मुंबई आणि पुण्यात मर्यादित असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता थेट रायगडपासून ते कोल्हापूर पर्यंत पसरली आहे. काल महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे ८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, वर्षाच्या सुरुवातीपासून नोंदवलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६८१ झाली आहे.

कोणत्या शहरांत किती कोरोना रुग्णसंख्या ? Corona Cases In Maharashtra

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ३२ नवीन कोरोना प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मुंबईच्या शेजारी असलेल्या नवी मुंबईमध्ये एक, ठाणे जिल्ह्यात दोन, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १४, पनवेलमध्ये एक, नाशिक शहरात एक, रायगड जिल्ह्यात दोन, पुणे महानगरपालिकेत १९, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तीन, पुणे महानगरपालिकेत १९, सातारा जिल्ह्यात २, सांगली महानगरपालिका क्षेत्रात ३ आणि कोल्हापुरात १ कोरोना रुग्ण (Corona Cases In Maharashtra) सापडला. कोरोनाचा प्रादुर्भाव हळू हळू संपूर्ण राज्यात पसरत चालल्याचं दिसतंय. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की आत्ता जे कोरोना रुग्ण सापडले आहेत त्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही.

कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये –

खरं तर कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये 2019 मध्ये झाली आणि 2020 मध्ये संपूर्ण जगभर हा विषाणू पसरला. भारतात तर करोडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांनी यातून स्वतःचा बचाव केला तर काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉक डाउन करण्यात आलं, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली होती. 2022 पासून जग हळूहळू पूर्वपदावर आले. परंतु आता हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे ही पुन्हा लाट येणार का अशी भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या या नव्या विषाणूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.