व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात मार्केट कमिटीमध्ये ऑक्सीजन बेडसह कोरोना सेंटर उभे करणार : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनाच्या वतीने यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला जात असताना, ही यंत्रणा कमी पडू लागली आहे. अशा वेळी राज्य शासनाच्या पणन विभागाच्यावतीने कोव्हिड केअर सेंटर अशा वेळी राज्य शासनाच्या पणन विभागाच्यावतीने कोव्हिड केअर सेंटर उभे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पणनमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, सध्या कोव्हिड यंत्रणा राज्यात कमी पडू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केट कमिटी जवळ असणाऱ्या वाढीव वार्षिक उत्पन्नातून कोव्हिड केअर सेंटर उभे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कमिटीच्या केअर सेंटरमध्ये चहा, नाष्टा याची सोय करण्यास सांगितले आहे. तसेच जिथे गरज असेल, तिथे ऑक्सिजन बेड सुरू करण्यात यावी. या सेंटरवर जिल्ह्याचे निबंधक नियंत्रण ठेवतील, तेथील खर्चास निबंधकच मान्यता देतील.

मार्केट कमिटीच्या सहाय्यानें शेतकऱ्यांचा माध्यमातून हे कोरोना बाधित रूग्णांसाठी सहकार्य होणार असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.