CORONA EFFECT ! भारतातून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेत ‘नो एंट्री’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था :  देशात करोना रुग्णांची संख्या ही धक्कादायकरित्या वाढत आहे. आज देशात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी केली आहे. आता अमेरिकेने देखील हा निर्णय घेतला आहे.येत्या चार मे पासून भारतातून येणाऱ्या प्रवेशावर अमेरिकेने बंदी घातली आहे.

भारतात कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहता अमेरिकेने हवाई प्रवास यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यो बायडन प्रशासन पुढील आठवड्यापासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी करत आहे. व्हाईट हाऊस ने शुक्रवारी सांगितले की अमेरिका चार मेपासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालणार आहे. इतकेच नाही तर अशा लोकांना ही अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही जे मागील 14 दिवसांपासून भारतात प्रवास करून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात कोरोनाचे अनेक प्रकारचे व्हेरियंट पसरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीयांना प्रवेश बंदी करण्यात आली असून चार मेपासून हा आदेश प्रभावी असे असे अमेरिकेने म्हटले आहे. या आधी अमेरिकेने आपल्या देशातील नागरिकांना भारतात न जाण्याचा आणि लवकरात लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान भारतासह इतर देशांनी देखील भारतीयांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. यापूर्वी ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रान्स, यूएई, पाकिस्तान आणि सिंगापूर ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांनी अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे कॅनडा, हॉंगकॉंग आणि न्यूझीलंड नही भारतासोबत सर्व कमर्शियल प्रवास पुढे ढकलले आहेत.

Leave a Comment