कोरोना महामारीने नोकरीबरोबरच मानसिक आरोग्यालाही दिला धक्का

0
65
blood cancer symptoms in marathi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना महामारीने प्रत्येकजण त्रस्त आहे. आर्थिक जगापासून सामान्य जीवनापर्यंत सर्व ट्रॅकच्या बाहेर गेले आहे. व्यापारी असो वा नोकरी करणारा प्रत्येकजण अस्वस्थ झाला आहे. लोकं हरप्रकारे या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हे सत्य देखील नाकारता येणार नाही की, या संकटामुळे अनेक लोकांच्या, विशेषत: तरुणांच्या मानसिक आरोग्याला गंभीर इजा झाली आहे. जी लोकं शिक्षण संपून नोकरीच्या शोधात होते किंवा अशी लोकं ज्यांना या साथीमुळे नोकरी गमवावी लागली.

एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, यूके हेल्थ फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, 22 ते 26 वयोगटातील (86 टक्के) तरुणांचा असा विश्वास आहे की, कोरोना महामारीमुळे नोकरी आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे.

संपर्क नसल्यामुळे मोठी समस्या
सर्वेक्षणानुसार, तरुणांचे म्हणणे आहे की, महामारी आणि लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या कौशल्याच्या आणि शिक्षणाच्या आधारावर त्यांना हवे असलेले आयुष्य साध्य करू शकले नाहीत. एवढेच नाही तर 86 टक्के तरुणांचा असा विश्वास आहे की, योग्य लोकांशी संपर्क न झाल्यामुळे त्यांचे जीवन देखील प्रभावित झाले. त्याच वेळी, 73 टक्के तरुणांचा असा विश्वास आहे की ज्यांचे चांगले कॉन्टॅक्ट होते, त्यांना या काळातही नोकरी मिळाली.

मानसिक समस्येने त्रस्त
सर्वेक्षणात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे 5 पैकी 4 तरुण म्हणजेच 80 टक्के तरुण मानसिक आरोग्याशी संबंधित समस्येने त्रस्त आहेत. त्याच वेळी, 10 पैकी 7 तरुण (69 टक्के) म्हणतात की, साथीच्या आजाराच्या तुलनेत आता मानसिक आरोग्याचे फायदे मिळवणे अधिक कठीण आहे. ते म्हणतात की, वाईट परिस्थितीमध्ये उपचारांचा विचार करणे कठीण होते.

नोकरी वाचवण्याबाबत तणाव
जगातील साथीच्या आजारामुळे परिस्थिती अजूनही गंभीर आहे. ज्यांना नोकरी आहे त्यांना ती वाचवणे कठीण झाले आहे, असे तरुणांचे म्हणणे आहे. 54 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना सक्तीखाली तात्पुरती किंवा कंत्राटी नोकरी करायला भाग पाडले गेले. 35 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, पुढील 6 महिन्यांत सुरक्षित आणि चांगली नोकरी मिळणे कठीण आहे.

कुटुंबाची मदत घेण्यास लाज वाटते
या संशोधनात सामील झालेल्या तरुणांपैकी 76 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी पालकांकडून पैसे घ्यावे लागतात. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर साथीच्या रोगातील ही परिस्थिती आमच्यासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. तरुणांचा असा विश्वास आहे की, महामारी संपल्यानंतर चांगली नोकरी मिळवणे खूप कठीण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here