महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा बनतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; आज पुन्हा सर्वाधिक रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे देशात तसेच महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रामधील महत्वाचा असलेला  जिल्हा म्हणजे जळगाव होय. सध्या ह्या जिल्हा कोरोना संसर्ग बाबतीत आघाडीवर आला आहे. सुरवातीला अनेक दिवस जिल्हा कोरोना संसर्ग पासून लांब होता. मात्र अनलॉक मिशन मध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

जिल्ह्यात अद्यापपर्यंत  कोरोना विषाणूची साखळी अजूनही तुटली नसल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या सलग सात दिवसात कोरोना बाधितांची संख्या 4 हजारा जवळ पोहोचली आहे.

जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 601 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 18297 झाली आहे. त्याच प्रमाणे 343 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 5191 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 12444 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 12 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 662 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 765 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यातील रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे- जळगाव शहर 129, जळगाव ग्रामीण 68, भुसावळ 13, अमळनेर 82 , चोपडा 41, पाचोरा 23 , भडगाव 27 , धरणगाव 29, यावल 8, एरंडोल 42, जामनेर 4 , रावेर 9, पारोळा 32, चाळीसगाव 57, मुक्ताईनगर 21, बोदवड 12 अशी रुग्ण संख्या वाढली आहे.


Leave a Comment