मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत राज्यातील जनतेला कोरोनाच्या संकटात राज्य सरकार काय करत आहेत याची माहिती देत राज्यातील जनतेला आश्वस्त केले.
अफवांबाबत खुलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या बाबतीत पसरत असलेल्या अफवांबाबत खुलासा केला. ते म्हणाले कि, ”मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार अशी एक अफवा पसरली आहे. लष्कर कशाला पाहिजे? आत्तापर्यंत जे काही केलं ते तुम्हाला सांगून करणार आणि तसंच करणार आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या संकटात सर्वपक्षिय बैठकत एकजुटीचं दर्शन
मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल एक सर्वपक्षिय बैठक बोलावली होती. याबाबत ते म्हणाले कि, ”काल एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. काल जी बैठक झाली ते एकजुटीचं वेगळं दर्शन होतं. महाराष्ट्रातले सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक वेगळी एकजूट काल पाहायला मिळाली.” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यानी केला औरंगाबादच्या घटनेचा उल्लेख..
”आज आपल्याशी बोलताना मी काहीसा व्यथित आहे. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी मनातून दुःखी झालो आहे. जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघाले आहेत आपण त्यांना आजही सांगतो आहे की राज्य सरकार तुमच्यासोबत आहे. इतर राज्यातल्या सुमारे सहा लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. इतर राज्यातही ट्रेन सुरु करुन केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात त्या मजुरांना जायचं तिथल्या सरकारसोबत बोलणी करुन मजुरांना पाठवण्यात येतं आहे. या सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला त्रस्त होण्याचं कारण नाही. तुम्ही थोडासा संयम बाळगा आम्ही तुमच्यासोबत आहोत” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/ZZ65xsR3Oy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 8, 2020
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”