कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाखाचे व्यावसायिक कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |गेल्या वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातच आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबाला सात्वन देण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज सुविधा देण्यात येणारी नवीन योजना राबविण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील चर्मकार समाज घटकांसाठी ही योजना असणार आहे. मृताच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती एनएसएफडीसी मार्फत पाच लाख रुपयांपर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना आहे. यामध्ये एनएसएफडीसी कर्ज 4 लाख रुपये 6 टक्के व्याजदराने आणि भांडवली अनुदान 1 लाख रुपयांचा समावेश आहे.

यासाठी मृत व्यक्तीचे नाव संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात, पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशन कार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील मुख्य वारसदार आणि कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत असल्याचे प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. खोकडपुरा येथील सामाजिक न्याय भवनातील कार्यालयात प्रस्ताव सादर करा. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संगीता पराते यांनी केले आहे.

Leave a Comment