हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘कोरोना पासपोर्ट’ नावाचा कागदपत्र ठेवण्याचा नियम येत्या काही दिवसांत लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने पहायचे असो, शाळेत जायचे असो किंवा काही विशिष्ट देशांमध्ये जायचे असो. अमेरिकेत याची सुरुवात होताना दिसते आहे. कोरोना पासपोर्ट हा प्रत्यक्षात कोविड -19 लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा कोविड -19 नकारात्मक असल्याचा चाचणी अहवाल असू शकतो.
तज्ञांच्या मते, जगभरातील या प्रकारच्या प्रमाणपत्रांवर काम सुरू झाले आहे. अमेरिकेतल्या अनेक मंत्र्यांनी याची वकिली केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, यामुळे शाळा, व्यवसाय आणि व्यवसाय संस्थां या पूर्णपणे उघडण्यास मदत होईल. ग्राहक शॉपिंग सेंटरमध्ये तर विध्यार्थी पुन्हा शाळेत वापस येऊ शकतील. हे कोरोनोचा प्रसार होण्यापासून रोखण्यात देखील मदत करेल.
बाकीच्या देशांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अनेक देशांनी लादलेले निर्बंध दूर करण्याचा युक्तिवाद मिळेल. बऱ्याच देशांनी यलो फिव्हर आणि पोलिओसाठी लसीकरणाच्या प्रमाणपत्रांची मागणी केली आहे. दुसरीकडे, कोरोना पासपोर्ट अनिवार्य करण्याबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेत रिपब्लिकन गव्हर्नरांखाली असलेल्या काही राज्यांना आदेश देण्यात आले आहेत की, एखाद्याकडून लसीकरणाचा पुरावा मागणे हा गुन्हा मानला जाईल. हा लोकांच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेचा मुद्दा मानला जात आहे.