हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने म्हणजेच JN.1 ने थैमान झाल्यास सुरुवात केली आहे. JN.1 या व्हेरियंटचे केरळमध्ये 300 रूग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता कोरोनाचा धोका कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत देखील पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
संभाजीनगरमध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळले
यापूर्वी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला होता. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. 66 नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये दोन रुग्णांना करणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे हे दोन रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्य म्हणजे, कोरोनाचा वाढता धोका पाहून प्रशासनाने मुंबईत मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी देखील मास्कचा वापर करावा असे आदेश दिले आहेत.
सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोनाच्या या नव्या वेरीएंट्स रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे. तसेच, खबरदारी म्हणून मुंबईकरांनी घरीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मात्र याबाबत कोणतीही सक्ती नसेल असे देखील मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे. रुग्णालयात विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.