जळगावात कोरोनाचा हाहाकार सुरूच; आज तब्बल 418 रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 418 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या आता 8605 झाली आहे. आज दिवसभरात 219 रूग्ण बरे झाले असुन जिल्ह्यात आतापर्यंत 5470 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 2708 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 427 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर १२१, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ २९, अमळनेर १५, चोपडा ४५, पाचोरा १८, भडगाव २, धरणगाव २५, यावल १६, एरंडोल १०, जामनेर ३८, रावेर ३३, पारोळा ५, चाळीसगाव ४४, बोदवड ३, मुक्ताईनगर २ अशी रूग्ण संख्या आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.56 % वर पोहोचलो आहे. जिल्ह्यातील 8605 बाधित रुग्णांपैकी 5470 रूग्ण त्वरीत व योग्य उपचार मिळाल्याने बरे होऊन घरी गेल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.


Leave a Comment