सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 65 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा गेल्या काही दिवसातील कमी झालेला आकडा आता वाढू लागल्याने धाकधूक वाढलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे पुन्हा कोरोना थोपवण्याचे आव्हान उभे राहताना दिसत आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 776 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 65 लोक बाधित आढळून आले आहेत. तपासणी पॉझिटिव्ह रेट हा 1 टक्क्यापेक्षा कमी झाला होता, मात्र आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 2. 34 टक्के आला आहे.
गेल्या महिन्यापासून सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट दिवसेंदिवस कमी होऊ लागला होता. मात्र 2-3 दिवसापासून बाधितांचा आलेला आकडा जिल्हावासियासाठी डोकेदुखी वाढवणारा आहे. त्यामुळे हळूहळू जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असलेल्या सातारा जिल्ह्यात पुन्हा कोरोना डोके वर काढत असून धाकधूक वाढतानाचे चित्र दिसत आहे.