औरंगाबाद | विभागीय स्तरावरील लोकशाही दिन व विभागीय महिला लोकशाही दिनाचे एप्रिल महिन्याच्या दुसरा सोमवार 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तथापि महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्याकरिता शासन आदेशान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना अपवादात्मक परिस्थितीत उपस्थित राहावयाचे असल्यास त्यांना कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी मागील 48 तासांत केलेल्या व निगेटिव्ह आलेल्या कोरोना आरटीपीसीआरचा अहवाल, प्रमाणपत्र सादर करणे बंधकारक राहील, असे निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने अर्जदारांनी सोमवार 12 एप्रिल रोजी विभागीय लोकशाही दिनाकरिता उपस्थित राह ताना मागील 48 तासांत कोरोना चाचणी केलेला रिपोर्ट पाहिजे. निगेटिव्ह आलेल्या कोरोना आरटीपीसीआरचा अहवाल, प्रमाणपत्र शाखा प्रमुख यांना सादर करणे बंधनकारक राहील. तहसीलदार (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये आवाहन केले आहे.