देशात मागील 24 तासांत 6 हजार 977 नवे करोनाग्रस्त, 154 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील तब्बल 1 लाख 38 हजार 845 पैकी 77 हजार 103 करोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उपाचारानंतर आतापर्यंत 57 हजार 720 रुग्णालायतून सुट्टी देण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 4 हजार 021 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान,कोरोनाबाधित एकूण रुग्णांपैकी देशातील चाळीस टक्केपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

सोमवारी पहाटेपर्यंत देशात बरे होणाऱ्यांची संख्या 41.28% आहे. मात्र, तरीही भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”