हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगातील अग्रणी कंपन्यांचे स्मार्टफोन निर्मितीचे उद्योग चीनमध्ये आहेत. भारतात स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरची आयात मोठ्या प्रमाणावर होते. ही आयात विशेषतः चीनमधून होत असते. मात्र, चीनमध्ये ‘करोना व्हायरस’मुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून येथील औद्योगिक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. यामुळे नजिकच्या काळात चीनमधून भारतात आयात होणाऱ्या मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या आयातीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान,चीनने ‘करोना व्हायरस’च्या भीतीने इतर देशांशी असलेल्या व्यापार थांबवला आहे. ‘करोना’ पसरू नये म्हणून निर्यातीवर अंशत: निर्बंध घालण्यात आले आहेत. बीजिंग, शांघाय, शेंझेन , ग्वान्गझू या शहरांमधील उद्योगांना ‘करोना’ची फटका बसला आहे. ‘करोना’चे सर्वाधिक बळी गेलेल्या हुबेई प्रांतातील झेझिंग आणि जिंन्नसगू भागातील शेकडो कारखाने मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे हुवेई, शाओमी, ओप्पो, विवो या स्मार्टफोन कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. २०१९ साली भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ तब्बल १४ कोटी ८० लाख होती. यात ‘मेड इन चायना’ उत्पादित उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोनचा तुटवडा जाणवू शकतो.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.