जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 300 पार, जिल्हावासीयांची चिंता वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे दहा, चोपडा येथील एक तर पळासखेडे, ता.जामनेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 320 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ह्या वाढत्या रुग्ण संख्येने आता जळगाव करांची चांगलीच चिंता वाढवली आहे. वाढती संख्या बघता आता शहरवासी व जिल्ह्यातील पादुर्भाव झालेल्या ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव शहरात व अन्य तालुका ठिकाणी लॉकडाउनचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, त्यांमुळे नागरिकांनी आता स्वतः सर्व नियम पाळत घरातच थांबणे आवश्यक असणार आहे.


Leave a Comment