सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यशासन आणि जिल्हाधिकारी सातारा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शासनाच्या नियमांचे भव्यदिव्य धिंडवडे काढले. पुसेसावळी (ता. खटाव) येथील एका दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री आले असता, तेथे शेकडो कार्यकर्ते, ग्रामस्थ, पुसेसावळीचे विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील नेतेमंडळी यांनी हजेरी लावलेली होती.
शासन व प्रशासन एरव्ही सामान्य माणसांना पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र आल्यास, मास्क नसल्यास, वेळेनंतर दुकाने उघडे ठेवल्यास असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमावलीचा धाक दाखवतात. मात्र यावेळी औंध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीमने जमावात सामील होत बघ्यांची भूमिका घेतेलेली होती. यावेळी सर्व नियम हे फक्त सामान्य मानसांनाच लागू करण्यात आले आहेत की काय? जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हे संयोजक, पालकमंत्री, उपस्थित पोलीस यंत्रणा आणि नेतेमंडळींवर कारवाई करणार? का सफाईदारपणे टाळाटाळ करणार? जर यांच्यावर गुन्हे दाखल होणार नसतील तर कोरोना काळात बावधन यात्रेच्या संयोजकांसह जिल्ह्यातील सामान्य माणसांवर दाखल झालेले गुन्हे माघारी घेणांर काय? याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/205057057743088
गृहराज्यमंत्र्याकडून पाठराखण
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्र्यानी गर्दीत एका दुकानाचे उदघाटन केले होते. तेव्हा त्यांच्यावर काही कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला असता. गृहराज्यमंत्री म्हणाले, पालकमंत्री संवेदनशील आहेत, ते स्वतः नियमांचे पालन करतात. परंतु अनावधानाने लोकांनी गर्दी केली असेल, तर नाईलाईज होतो. या संदर्भात मी पालकमंत्र्याशी बोलेन.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा