नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोनाने कहर माजवला आहे. रोज नव्याने आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र ताण पडत आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. काही ठिकाणी ऑक्सीजन तर काही ठिकाणी औषधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
देशातील फक्त आर्मी राखीव हॉस्पिटल मध्ये विशेष covid-19वॉर्ड निर्मिती करण्यात येणार आहे. यात सामान्य नागरिकांवर ही उपचार होतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता आर्मी हॉस्पिटलमध्ये देखील सामान्य नागरिकांवर उपचार करण्यात येणार आहेत. देशातील लखनऊ, पटना, अहमदाबाद, नाशिक यासह देशातील काही शहरात हे हॉस्पिटल्स आहेत. याबाबतचे आदेश राजनाथ सिंह यांनी डिफेन्स सेक्रेटरी यांना दिले आहेत.
DRDO आणि HAL यांच्या कॅम्पस मध्ये ही कोविड हॉस्पिटल्स उभारणीचे काम जलद गतीने सुरू झाले आहे. देशातील आर्मीच्या 63 हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत दिल्या जाणाऱ्या डीआरडीओ फॅसिलिटी आधारावर 63 हॉस्पिटलमध्ये covid-19 उभारणी केली जाणार आहे.केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या या निर्णयामुळे आता covid-19 रुग्णांना आर्मी कडून देखील मदतीचा हात मिळणार आहे.
COVID-19: Defence Minister asks Army Chief, Defence Secy, DRDO chief to offer expertise, facilities to civilians
Read @ANI Story | https://t.co/nqHPv7UkHP pic.twitter.com/HNpT2ZzxMJ
— ANI Digital (@ani_digital) April 20, 2021