कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नुकतेच कराड तालुक्यात पुन्हा 12 आणि सातारा येथे 6 अशा एकूण 12 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये सातारा येथील सहा कैद्यांचा समावेश असल्याचे समजत आहे. आज सकाळी कराड तालुक्यात 2 आणि सातारा येथे 1 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले होते. त्यानंतर आता दुपारी पुन्हा तब्बल 18 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे.
https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/
ताज्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 113 वर पोहोचली आहे. तर कराड तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा 84 वर गेला आहे. सातारा जिल्ह्याने कोरोना रुग्णांच्या ऐकून आकडेवारीत शंभरी पार केल्याने आता जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार तांबवे 1, गमेवाडी 1, गोटे 1, वनवासमाची 1, आगाशिवनगर 3, उंब्रज 1, कराड 2 शहर, बनवडी 1, खोडशी 1 तसेच सातारा येथील सहा कैद्यांचा समावेश आहे. आज सकाळी कराड तालुक्यातील 2 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले होते. आता पुन्हा वाढलेल्या रुग्णांमुळे आज एकाच दिवशी कराड तालुक्यात 14 रुग्ण सापडले तर सातारा येथे 7 रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”