राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार १३५ वर तर मुंबईत ७१४ रुग्णांची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | कोरोना विषाणुने राज्यात आता चांगलेच पाय पसरले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांसोबतच ग्रामिण भागातही कोरोनारुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज १ हजार पार गेली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे ११७ नवीन रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यातील एकुन कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५ झाली आहे. यामध्ये मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या आता ७१४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. देशात सध्या ४ हजार ५०० पार कोरोना रुग्ण आहेत. यातील ३५२ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात कोरोनामुळे आत्तापर्यंत १२४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –