OLAच्या हजारो कर्मचाऱ्यांवर येऊ शकते घरी बसण्याची वेळ; कंपनी घेऊ शकते ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळं बऱ्याच व्यवसाय क्षेत्रांसमोर आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. अशातच आपला व्यवसायाची विस्कटलेली आर्थिक गणित जुळवताना अनेक व्यवसाय कंपन्या कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. या कठोर निर्णयात कर्मचारी कपात हा एक मोठा निर्णयही आहे. ज्याचा फटका सध्याच्या घडीला कॅब (टॅक्सी) सेवा पुरवणाऱ्या OLA या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसणार असल्याची चिन्हं आहेत. UBER कडून आर्थिक संकटाच्या या काळात जवळपास ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्यानंतर अवघ्या काही कालावधीतच OLA मधील कर्मचारी कपातीचं वृत्त समोर आलं आहे.

OLA चे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली आहे. या पत्रकात कंपनीच्या सेवेत असणाऱ्या जवळपास १ हजार ४०० कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्वभावाचा थेट परिणाम OLA च्या कमाईवर आणि एकंदरच आर्थिक गणितावरही झाला आहे. मागील २ महिन्यांमध्ये आपल्या कंपनीच्या नफ्याचा दर हा थेट ९५ टक्क्यांनी खाली आला आहे.

मुख्य म्हणजे भारतासह संपूर्ण जगातच या संकटानं कोट्यवधी लोकांचं आयुष्य, त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य पूर्ण बदललं आहे’, असं अग्रवाल म्हणाले. OLAवर दिसून येणारे याचे परिणाम हे प्रदीर्घ काळासाठी असतील याचे संकेतही त्यांनी दिले. कोरोनापूर्वीचा काळ इतक्या सहज परत येईल अशी काही चिन्ह दिसत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग, अस्वस्थता आणि अती काळजी हे अनेकांच्याच जगण्याचे निकष झालेले असतील, असंही त्यांनी पत्रकात लिहिलं आहे. कामावरुन नाईलाजास्तव कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांचा पगार आणि नोटीस पिरियड काळातील पगारही देण्यात येणार असून, या काळात कंपनी संशोधन आणि विकासाच्या घटकांमध्ये अधिक गुंतवणूक करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”