सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
करोना प्रसार वाढू नये, याची खबरदारी म्हणून प्रशासनाने मार्केट यार्डातील सौदेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला असून सुमारे २० कोटीची व्यवहार ठप्प झाले. हळदीचे सौदे पूर्णपणे बंद राहीले. गुळाचे सौदे मात्र काही प्रमाणात खाजगी पातळीवर झाल्याची चर्चा असून गुळाचे सुमारे पन्नास टक्के सौदे झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पणन विभागाने धान्याचे व्यवहार मात्र सुरूच ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलिसांनी मध्यस्थी करीत ३१ मार्चपर्यंत सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. व्यापारी आणि अडत्यांनी सौदे सुरु ठेवून गर्दी केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. करोना या संसर्गजन्य विषाणचा सर्वत्र फैलाव वाढत आहे. जिल्हयात आत्तापर्यंत एकही रूग्ण आढळून आला नसला तरी सर्वत्र प्रतिबंधात्मक उपायोजना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. येथील मार्केट यार्डात हळद गुळ बेदाणा आदी शेतीमालाचे सौदे काढण्यात येतात, यासाठी बाहेरून व्यापारी, शेतकरी गोठ्या संयेने येतात. यामुळे गर्दी होते. गर्दीत बाहेरून रूग्ण होवून करोनाची लागण होवू नये, यासाठी यार्डातील सर्व शेतीमालाने सौदे बंद ठेवण्याची मागणी काही व्यापारी, शेतकर्यांनी केली होती. पोलीसांनी सौदे बंद करा अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.
यामुळे सौदे बंद ठेवण्यात आले. दुसर्यादिवशी हळद व गुळासह सर्व सौदे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे मार्केट यार्डमधील उलाढालीवर सुमारे १५ ते २० कोटींचा परिणाम झाला. मात्र काही ठिकाणी गुळाचे सौदे झाल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दी न करता, काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सौदे करून व्यवहार करण्यात येत आहेत, त्यामुळे गुळाचे सौदे केवळ ५० टक्केच बंद राहीले.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा