औरंगाबाद । औरंगाबाद शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आज रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला.
बीड बायपास लगत असलेल्या सातारा परिसरातील मुबईहून परत आलेल्या व्यक्तीला करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानं ३ एप्रिलला सायंकाळी घाटीत दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी चाचणी करण्यात आली. रिपोर्टमध्ये करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच रविवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या औरंगाबाद शहरात तब्बल ७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई पुण्यानंतर आता कोरोनाने मराठवाड्यात हातपाय पसरण्यास सुरु केली आहे. मराठवाड्यची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबद शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं औरंगाबादमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर मराठवाड्यातील इतर शहरात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं चिंतेत आणखी भर पडली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”