नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांतील आकडेवारीनुसार 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार पार पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘आतापर्यंत 85 हजार 940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 2752 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 30 हजार 153 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जाणून घ्या देशभरातील सर्व राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसा, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे 1 मे ते 15 मेपर्यंत कोरोना व्हायरसमुळे 1502 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1 मेपर्यंत 1147 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु, 15 मेपर्यंत 2649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, देशात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 56.70 टक्के लोकांचा मृत्यू 1 मे ते 15 मे दरम्यान झाले आहेत.
कोणत्या राज्यात किती मृत्यू?
महाराष्ट्रात 1068, गुजरातमध्ये 606, मध्यप्रदेशमध्ये 239, पश्चिम बंगालमध्ये 225, राजस्थानमध्ये 125, दिल्लीमध्ये 123, उत्तर प्रदेशमध्ये 95, आंध्रप्रदेशमध्ये 48, तामिळनाडूमध्ये 71, तेलंगणामध्ये 34, कर्नाटकात 36, पंजाबमध्ये 32, जम्मू-काश्मीरमध्ये 11, हरियाणामध्ये 11, बिहारमध्ये 7, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, ओडिशामध्ये 3, चंदिगढमध्ये 3, हिमाचल प्रदेशमध्ये 3, आसाममध्ये 2 आणि मेघालयमध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”