बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले काही दिवस होम क्वारंटाइनमध्ये असलेले काही लोक घरातून पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासन वारंवार अशा लोकांना होम क्वारंटाइनचे पालन करण्याची विनंती करत आहेत. मात्र, काही बेजबाबदार माणसं प्रशासनाच्या आवाहनाकडे कानाडोळा करत आहेत. करोनाचा संसर्गाचे गांभीर्य अजूनही त्यांना नसल्याचं त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या कृतीवरून दिसत आहे. दरम्यान, खुद्द प्रशासनातील व्यक्तीनेच नियमांचं उल्लंघन केल्याची एक धक्कादायक घटना केरळमध्ये उघडकीस आली आहे.

केरळ येथे होम क्वारंटाइन असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याने घरातून पळ काढला असल्याची धक्कादायक समोर आलं आहे. १८ मार्चपासून हा अधिकारी सरकारी निवासस्थानी होम क्वारंटाइनमध्ये होता. अधिकाऱ्याने घरातून पळ काढत उत्तर प्रदेशातील आपलं गाव गाठलं. कोल्लम येथे उप-जिल्हाधिकारी पदावर असणाऱ्या अनुपम मिश्रा यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, होम क्वारंटाइन असणाऱ्यांची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याकडून रोज पाहणी केली जाते. यावेळी अनुपम मिश्रा हे घरात नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तपास केला असता अनुपम मिश्रा उत्तर प्रदेशात असल्याचं समोर आलं. कोणालाही कोणतीही माहिती न देता ते गेले होते. हा अत्यंत गंभीर विषय असून सरकारडे यासंबंधी अहवाल सोपवला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

धक्कादायक! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment