मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६९० झाली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील एकुण कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबई आज २९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर पुणे १७, पिंपरी चिंचवड ०४, अहमदनगर ०३,औरंगाबाद ०२ अशी आज दिवसभरात ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आतापर्यंत ५६ सदस्य बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत असे टोपे यांनी सांगितले आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे –
मुंबई – ३९८
पुणे, पिंपरी चिंचवड – १०३
सांगली – २५
ठाणे – ७७
नागपूर – १७
अहमदनगर – २०
लातुर – ८
बुलढाणा – ५
यवतमाळ – ४
सातारा – ३
औरंगाबाद – ५
उस्मानाबाद – ३
कोल्हापूर – २
रत्नागिरी – २
जळगाव – २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोली – १
महाराष्ट्रातील एकूण रुग्ण – ६६१
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णांची संख्या पोहोचली ३ हजार ५७७ वर
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९० वर, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार
तरुणाईचं मन आणि हृदय लॉकडाऊन करणारी भारताची ‘एक्सप्रेशन क्वीन’
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?