मुंबई | कोरोना व्हायरसने राज्यात धुमाकुळ घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात नवे ४६६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर एका दिवसात सापडलेल्या कोरोनाबाधितांचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे राज्यात आता अधिक खबरदारी घेण्याच्या सुचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ४६६६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील सर्वाधित रुग्ण एकट्या मुंबई शहरात असून मुंबईतील आकडा ३०३२ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात ५९४ कोरोनाबाधित आहेत. आज सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनारुग्ण सापडले आहेत. ग्रीन झोनमधील सोलापूर जिल्हा आता आज १० रुग्ण सापडल्याने रेड झोनमध्ये गेला आहे.
दरम्यान राज्यात आत्तापर्यंत २३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात मुंबईत १३९ मृत्यूंची नोंद आहे तर पुण्यात ४९ जणांचा आत्तापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाग्रस्तांची जिल्हानिहाय ताजी आकडेवारी पाहण्यासाठी खालील ट्विटरलिंकवर क्लिक करा.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४६६६ वर, दिवसभरात ४६६ नवीन रुग्णांची भर#HelloMaharashtra #CoronavirusOutbreakindia #coronaupdatesindia pic.twitter.com/fCMo6TG9wo
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 20, 2020