पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १० हजारच्या पुढंं गेला आहे. पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये मागील १२ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९ हजार ९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार ०१२ वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोनाच्या महामारीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्याला बसला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांपुरता मर्यादित होता. इथं रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढत होती.
तोपर्यँत ग्रामीण भागाला याची झळ बसली नव्हती. मात्र, इतर ठिकाणांहून जिल्ह्यात आलेल्या लोकांमुळं कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागांतही झाला. आंबेगाव, जुन्नर, हवेली, मुळशी, खेड अशा सर्वच तालुक्यांत करोनानं शिरकाव केला. त्यानंतर तिथंही रुग्णांची संख्या वाढत गेली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”