घरातच कोरोना सर्वाधिक वेगाने पसरतो; जाणून घ्या कसे ते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले ३ महिने सातत्याने जगभरात आणि पर्यायाने भारतात वाढणारे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आता हळूहळू संचारबंदीचे नियम शिथिल करून कामकाजाला सुरुवात केली जात आहे. तोवर शास्त्रज्ञांनी घरीच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले आहे. या संशोधनात कोरोनाचा सार्स कोव-२ हा विषाणू पूर्वीच्या सार्स विषाणूपेक्षा अधिक घातक आहे. आणि संक्रमण पसरल्यावरच त्याची लक्षणे दिसून येतात असेही या संशोधनात दिसून आले आहे. चीनमधील गुवांगझोऊ या शहरात हे संशोधन करण्यात आले आहे.

३५० रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २००० लोकांचा अभ्यास करून हे अनुमान काढण्यात आले आहे. या संशोधनात संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमणाचा किती धोका आहे याच्याही शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांनी रुग्णाला लक्षणे दिसण्याआधीच त्याच्या कुटुंबातील अथवा त्याच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीला संक्रमण होऊ शकत असल्याचे समोर आले आहे. याची ३९% शक्यता असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. विषाणूचा इन्क्युबेशन काळ अर्थात संक्रमण होण्यापासून लक्षणे दिसेपर्यंतच्या काळात मोठ्या प्रमाणात संक्रमण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनात त्यांनी विलगीकरण केले नसते तर ४० – ५०% संक्रमणाचे प्रमाण वाढले असते असे सांगण्यात आले.

आपल्याला संक्रमण रोखण्यास उशीर झाला असल्याचे पब्लिक हेल्थ स्कुलचे वर्जिनिया पिटजर यांचे म्हणणे आहे. तसेच आता जे संक्रमण होईल ते लक्षणे दिसण्यापूर्वीच होण्याच्या शक्यता अधिक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान भारतात आज १३ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले जगभरात सर्वाधिक रुग्ण आज भारतात सापडले आहेत. भारतातील रुग्णसंख्या तुलनेने कमी प्रमाणात वाढत असल्याचे म्हंटले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”