लॉकडाउनच्या दिवसांत घरात जर फक्त झोप काढत असाल तर मग आधी ‘हे’ वाचा !

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आरोग्यामंत्रा | ऑफिस आठवडाभर काम केल्यानंतर  प्रत्तेकजण रविवारच्या सुट्टीची वाट पाहत असतो. रोजच्या कामाच्या ओझ्याने थकलेल्या आपल्याला एकदिवस सुट्टी गरजेचीच असते. इतर दिवशी धावपळीचे जीवन जगणाऱ्या लोकांना रविवारची झोप म्हणजे वर्षातून एकदा येणारी दिवाळी वाटत असते. त्यामुळे बहुतांश जण रविवारचा सुट्टीचा दिवस आरामाच्या नावाखाली झोपण्यात घालवतात. मात्र सुट्टीच्या दिवशी असे प्रमाणापेक्षा जास्त झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात सुट्टीच्या दिवशी फक्त झोपून राहिल्याने काय होऊ शकते.

१) आपल्या शरीराला रोजच्या चालायची, काम करण्याची, कामामुळे होणाऱ्या शरीराच्या हालचालींची सवय झालेली असते. या सवयींमध्ये जर अचानक बदल झाला तर ते आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.

२) शरीराला अचानक जास्त विश्रांती देणे हृदयासाठी चांगले नाही. असे केल्याने हृदयाचा त्रास होण्याचा संभव असतो.

३) सुट्टीच्या दिवशी संपूर्ण दिवस झोपून काढल्याने शरीर आळशी बनते. प्रमाणापेक्षा जास्त झोपल्याने ताजे वाटण्या एवजी कंटाळवाणे वाटते.

४) दिवसभर झोपल्याने माणसाची भूक कमी होते. तसेच अपचनाचा त्रास होतो.

५) अतिप्रमाणात झोपल्याने डोके जड होते. आणि त्याचा त्रास दुसर्यादिवशी जास्त होतो. आदल्यादिवशी जास्त झोपल्याने त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ शकतो.

इतर महत्वाचे –

रविवारीच सुट्टी का असते? जाणुन घ्या

आनंदी राहण्यासाठी या पाच गोष्टी दररोज करा

जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात