कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये; गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ”आपला देश करोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये” असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजपा नेत्यांचे कानच टोचले आहेत. “एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे, असं गडकरी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सध्या राज्यात पालघरची घटना, राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिफारस, कोरोनाच्या काळात गरिबांना धान्य वाटप, कोरोनाच्या चाचणीचे बदलेले निकष अशा मुद्यांवरून राज्यातील भाजप संगठन सरकारला घेरण्याचा प्रयास करत आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”सध्या देश करोनाच्या संकटाशी लढतोय. हे संकट हे देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. या संकटात राजकारण करणं गैर आहे. राष्ट्रकारण आणि विकास यांना महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक संवेदनशील नेत्याने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे” असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

आपत्तीचं रुपांतर इष्टापत्तीत कसं करता येईल याचा विचार आपला देश करतो आहे. त्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहेत असंही गडकरींनी म्हणाले. मुंबई पुण्यातली स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तिथे कदाचित सगळं काही सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. तरीही महाराष्ट्रातल्या ज्या भागांमध्ये रुग्ण नाहीत तिथे हळूहळू उद्योग आणि इतर व्यवहार सुरु करता येऊ शकतील असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

देशात करोनामुळे  स्थिती ही गंभीर आहे. मात्र आपण कोरोनाचा सामना नेटाने करतो आहोत. आपल्या देशाने बरंच नियंत्रण मिळवलं आहे. मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, कामगारांच्या निवाऱ्याची आणि अन्नाची व्यवस्था करणं हे नियम पाळून उद्योग, कंपन्या सुरु केल्या तर चालणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

सध्या देशभरात प्रश्न आ वासून उभा आहे तो कामगारांचा. त्यांची काळजी सामाजिक संस्था घेत आहेत. राज्य सरकारंही काळजी घेत आहेत असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी केली होती. त्याबाबत विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी मला काही बरोबर वाटत आंही. स्थलांतरित मजुरांसाठी सध्याच्या गंभीर परिस्थितीत विशेष ट्रेन सुरु तर केल्या सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नाही. स्टेशनवर एकच गर्दी होण्याची शक्यता होईल आणि यातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. वांद्रे स्टेशनवर काय घडलं होत हे आपल्या सर्वांसमोर आहे” असं गडकरी यांनी सांगितलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews,. 

Leave a Comment