युरोपातील ‘हा’ देश आता कोरोनामुक्त; जिंकली कोरोनाची लढाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. अशातच एक युरोपीय देश कोरोनामुक्त झाला आहे. युरोपातील एक देश कोरोनामुक्त झाला आहे. युरोपातील देश स्लोवेनिया सरकारने घोषणा केली आहे की, ‘देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. तसेच त्यांना विशिष्ट आरोग्यासंदर्भातील उपाययोजनांची आवश्यकता नाही.’ असं करणारा स्लोवेनिया युरोपातील पहिला देश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन आठवड्यांमध्ये येथे दरदिवशी सातपेक्षा कमी नवीन रुग्ण समोर येत आहे. पंतप्रधान जनेज जनसा यांनी 14 मे रोजी संसदेत सांगितलं की, ‘स्लोवेनिया मागील दोन महिन्यांपासून महामारीचा सामना करत आहे. परंतु, आज स्लोवेनियाची स्थिती युरोपमध्ये सर्वात चांगली आहे.’

स्लोवेनिया देशातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १४ दिवसांपासून याठिकाणी ७ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लक्षात येताच लादण्यात आलेले काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. शेजारील ऑस्ट्रिया, इटली आणि हंगरी येथून स्लोवेनियाला जाण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. स्लोवेनियाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता इतर युरोपीय संघाच्या इतर देशांतील लोकांना स्लोवेनिया येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना ७ दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार नाही.पण जे नागरिक युरोपीय संघातील नाहीत त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढे सरकारने सांगितले की, विदेशी नागरिक, ज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसतील, त्यांना आता देशात येण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

स्लोवेनियामध्ये 12 मार्च रोजी महामारी घोषित करण्यात आली आहे. येथे जवळपास 20 लाख लोक राहतात. इटली, ऑस्ट्रिया, हंगरी आणि क्रोएशिया शेजारील देशात आहेत. स्लोवेनियामध्ये आतापर्यंत 1464 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 103 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment