औरंगाबाद – घराच्या मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ लिपिक आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सोहेल पठाण फेज अहमद पठाण (52) असे अटकेतील लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी लिपिकाविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महापालिकेच्या सेंट्रल नाका येथील कार्यालयातील मालमत्ताकर विभागात तो कार्यरत आहे. डिसेंबर महिन्यात पठाण तक्रारदाराच्या घरी गेला होता. तेथे त्याने तुमच्या घराला चुकीच्या पद्धतीने कमी कर लावण्यात आला आहे. यामुळे तुमच्या घरपट्टीची फेररचना करण्यासाठी पुनर्मूल्यांकन करणार असल्याचे सांगितले. तक्रारदारांनी मनपाने नियमानुसार कर लावलेला आहे असे सांगितले. पठाण अनेकदा त्यांच्या घरी गेल्यावर तुमच्या इमारतीचे पुनर्मूल्यांकन करतो असे म्हणाला. अन्यथा दहा हजार रुपये लाच त्याने मागितली.
त्यानंतर तक्रारदारांनी 16 डिसेंबर रोजी एसीबी कडे तक्रार नोंदवली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली तेव्हाही त्यांनी दहा हजार रुपये लाच मागितली. मात्र, नंतर त्याला संशय आल्याने त्याने रक्कम घेतली नाही. शेवटी एसीबीने काल पठाणला ताब्यात घेतले.