Monday, January 30, 2023

तिसऱ्या लाटेसाठी मनपाची तयारी; 7 हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था

- Advertisement -

औरंगाबाद | सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होऊ शकतो. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्याच अनुषंगाने मनपा आयोगान हे पाऊल उचलले आहेत.  सध्या खाजगी व शासकीय हॉस्पिटल मिळून शहरात सात हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाली असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली.

तसेच गरवारे हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयासाठी ऑक्सीजन प्लांट उभारणी सुरू आहे. मुंबईची कंपनी सीएआर फंडातून देत असलेल्या ऑक्सीजन प्लांट चे साहित्य शहरात आले आहे. या दोन्ही प्लांटमुळे शहरातील किमान पाचशे जास्तीच्या बेडला ऑक्सिजन मिळू शकतो.

- Advertisement -

मेल्ट्रोन येथे सध्या मनपाकडून ऑक्सिजन सुविधा सुरु आहे. तेथे सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. या दोन प्लांटमुळे कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होईल हवेतील ऑक्सिजन व इतर वायू वेगळे करणारी यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.