पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभारणार, 3 महिन्यांत कामाला सुरुवात- मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Corridor Pandharpur fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर उभारणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात होणार असून या प्रकल्पामुळे पंढरपूरच्या विकासास चालना मिळेल आणि भाविकांना सुविधा होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. त्यानंतर विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल कि, अतिशय समाधानकारक काम चाललं आहे. खूप चांगल्या पद्धतीने रिस्टोरेशन झालेलं आहे. जुने स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे. यातील काही काम आषाडीच्या आधी होईल, तर काही काम आपल्याला आषाडी नंतर करावं लागेल असं फडणवीसांनी म्हंटल. कॉरिडॉरचा ब्रॉड आराखडा आपण तयार केला आहे. यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता, काही घरं ताब्यात घ्यावी लागणार आहेत. त्या लोकांचे सुद्धा योग्य पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल. त्यांना चांगला मोबदला दिला जाईल आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूर मधल्या कॉरिडॉर बाधितांना देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपूरच्या विकासास चालना मिळेल आणि भाविकांना सुविधा होईल असं मत देवेंद्र फडणविस यांनी व्यक्त केलं. लोकांना विश्वासात घेऊनच आम्ही हे काम करणार आहोत, त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींशी आणि या भागातील लोकांची चर्चा करण्यात येईल. त्यांना आराखड्याबाबत समजवून सांगण्यात येईल, सरकार कडून त्यांना काय देण्यात येणार आहे हे सुद्धा सांगण्यात येईल ,, त्यानंतरच लगेच आम्ही जमिनीचे संपादन करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.