हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता 2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा केलेली आहे. त्याप्रमाणे प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे. आणि याबद्दलची माहिती महाराष्ट्राची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.
2023 मध्ये अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अगदी कमी होते. या सगळ्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव खूप कमी झाले. आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर आता सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीच्या आधीच या निर्णयाची घोषणा केली होती. तसेच जो अर्थसंकल्प पार पडला, त्यात देखील याची माहिती दिलेली होती. आता त्यानुसार आज शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे.
त्यामुळे आता 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस उत्पादकांचे नुकसान झालेले आहे. त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1548 कोटी 34 लाख रुपये मिळणार आहे. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2646 कोटी 34 लाख रुपये एवढा निधी मिळणार आहे.
या अनुदानासाठी ईपीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी पात्र ठरणार आहे. त्यानंतर डीबीटी थेट शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे. त्यांना नुकसान भरपाई सरकारकडून मिळणार आहे