Countries To Tourism At Low Cost | भारतीयांना पर्यटनासाठी परदेशी जाण्याची आवड आहे. जगात असे अनेक पाश्चिमात्य देश आहेत जिथे पर्यटन करणे प्रत्येकाला आवडत. परंतु सर्वच लोक काही युरोप आणि अमेरिकाचा खर्च पेलावू शकत नाहीत. कारण युरोप आणि अमेरिकन चलन हे जगातील सर्वात मजबूत चलनांपैकी एक आहेत. तसेच यांच्या तुलनेत भारतीय रुपया खूप कमकुवत वाटायला लागतो. त्यामुळे युरोपात फिरण्यासाठी भारतीयांना खूप पैसे लागतात. अनेकांना ते झेपवत देखील नाही. परंतु भारतीयांना फिरण्यासाठी आणि आरामाने राजा सारखी ट्रिप पुर्ण करता येईल असे पण काही देश आहेत. जिथे भारतीय रुपया खूप मजबूत समजला जातो. त्यामुळे तुम्ही कमी पैशात उत्तम दर्ज्यांची सैर करू शकता. असे कुठले देश भारतीयांना पर्यटनासाठी खुले आहेत ते पाहू.
1) कंबोडिया :(1 INR = 49.40 कंबोडियन रिएल)
निसर्गाचे सौदंर्य लाभलेला कंबोडिया भारतीय लोकांना परदेशवारी करून येण्यासाठीचे उत्तम आणि परवडणारे ठिकाण आहे. कंबोडिया हे सर्वात नयनरम्य ठिकाणांपैकी एक आहे जिथे भारतीय रुपया तुम्हाला अधिक मजबूत आहे हे जाणवेल. जास्त खर्च न करता असंख्य ठिकाणे तुम्ही पाहून येऊ शकता व मनमर्जी गोष्टी विकत घेऊ शकता.
2) व्हिएतनाम : (1 INR = 292.87 व्हिएतनामी डोंग) Countries To Tourism At Low Cost
भारतसोबत प्रगतीची वाटचाल करणारा आणि आशिया खंडातील जागतिक दृष्ट्या महत्वपुर्ण देश म्हणजे व्हिएतनाम. व्हिएतनाममध्ये, भारतीय रुपया समृद्धीची भावना देते, ज्यामुळे पर्यटकांना, विशेषत: भारतातील लोकांना मोहित करणाऱ्या या ठिकाणाचा प्रवास तुम्हाला रम्य वाटतो. भारताचा एक रुपया म्हणजे व्हिएतनाम चा 292.87 व्हिएतनामी डोंग ठरतो. त्यामुळे भारतातून कमी पैसे घेऊन जरी तुम्ही व्हिएतनामला गेला तरी तुम्ही त्याठिकाणी मनसोक्त मजा करू शकता.
3) नेपाळ (1 INR = 1.60 नेपाळी रुपया)
प्रवासात चित्तथरारक अनुभव शोधणार्यांसाठी नेपाळ देखील एक आदर्श पर्याय आहे. भारतीय रुपयाने तुम्हाला इथे देखील आपले स्थान मजबूत केल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्च करण्याच्या मर्यादा ओलांडू शकाल. आणि तुम्ही आजवर न घेऊ शकलेला अनुभव घेऊ शकाल. भारताचा 1 रुपया म्हणजे नेपाळचा 1.60 रुपया आहे. त्यामुळे भारतातून तुम्ही १००००० रुपये घेऊन गेला तर तुम्हाला त्याठिकाणी १६०००० रुपये खर्च करता येतील.
4) श्रीलंका- (1 INR = 3.93 श्रीलंकन रुपया)
मर्यादित बजेटमध्ये श्रीलंका एक्सप्लोर करताना, भारतीय रुपयाच्या माध्यमातून तुम्हाला आलिशान सुट्टीचा आनंद घेऊ देतो. श्रीलंका भारताच्या अगदी जवळच असल्यामुळे प्रवास खर्च (Countries To Tourism At Low Cost) देखील खूप कमी आहे. श्रीलंका फिरण्यासाठीचे उत्तम ठिकाण असून डोंगरदऱ्या पासून ते अगदी बीचवर फिरण्याचा आनंद देखील तुम्हाला इथे मिळेल. भारताच्या 1 रुपयाची तुलना 3.93 श्रीलंकन रुपयासोबत होते, त्यामुळे श्रीलंकेत तुम्ही कमी पैशात (Countries To Tourism At Low Cost) जास्त आनंद लुटू शकता.
5) हंगेरी : (1 INR = 4.22 फोरिंट)
हंगेरी हा युरोपातील देश असला तरी देखील भारतीय पर्यटकांना हंगेरीचा पर्याय उपलब्ध आहे. जिथे तुम्ही युरोप फिरण्याचा आनंद मिळवू शकाल पण तेही तुमच्या बजेट मध्ये त्यामुळे तुम्ही युरोपवारी करू इच्छित असाल तर तुम्हाला हंगेरी या देशाचा विचार नक्की केला पाहिजे. भारताचा एक रुपया म्हणजे हंगेरीच्या चलनानुसार 4.22 फोरिंट आहे. त्यामुळे याठिकाणी सुद्धा तुम्ही कमी खर्चात युरोप सफर करू शकता.
6) कोस्टा रिका (1 INR = 6.30 Colon)
समृद्ध जैवविविधता आणि आश्चर्यकारक लँडस्केपसह, कोस्टा रिका हे तुमच्या कॅरिबियन स्वप्नांना सत्यात बदलण्यासाठी एक मोहक ठिकाण आहे. हे सर्व तुमच्या बजेटवर ताण न ठेवता, भारतीय रुपयाच्या सोबत तुम्ही पुर्ण करू शकता.