हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 या वर्षाचा निरोप घेण्यासाठी जगभर जय्यत तयारी सुरू आहे. नवीन वर्षाची सुरुवात व्हायला आता फक्त काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल, परंतु जगभरात असे देश आहेत कि ते एक दिवस अगोदरच आणि एक दिवस नंतर नववर्षाचं स्वागत करतात. सर्वात अगोदर नवीन वर्ष साजरे करणारा या पृथ्वीवरील पहिला देश दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूहावरील टोंगा हा देश आहे. तर युनायटेड स्टेट्सपासून जवळच असलेल्या हॉलँड आणि बेकर बेटांवरील लोक शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करतात.
टोंगा देशात किती वाजता केले जाते नववर्षाचं स्वागत?
नवीन वर्ष साजरे करणारा या पृथ्वीवरील पहिला देश दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूहावरील टोंगा हा देश आहे. यामागचे कारणही तसे खास आहे. टोंगा भारतापेक्षा 7 तास 30 मिनिटे पुढे धावतो. म्हणजेच, 31 डिसेंबर रोजी, जेव्हा भारतात दुपारी 4:30 वाजले असतील, त्याच वेळी टोंगामध्ये म्हणजेच 01 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्ष सुरू झालेले असेल. होय, हा जगातील पहिला देश आहे, जिथे नवीन वर्ष प्रथम साजरे केले जाते. यानंतर सिडनीचा (ऑस्ट्रेलिया) क्रमांक लागतो.
सर्वात शेवटी हॉलँडमधील बेटावर करतात नववर्षाचं स्वागत
युनायटेड स्टेट्सपासून जवळच असलेल्या हॉलँड आणि बेकर बेटांचे निर्जन बेट, अगदी शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करते. येथील लोक नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता (जीएमटीनुसार) किंवा संध्याकाळी 05.30 (भारतीय वेळेनुसार) करतात.
‘या’ देशांमध्ये GMT नुसार यावेळी नवीन वर्ष साजरे केले जाते.
न्यूझीलंड : सकाळी 10.15
ऑस्ट्रेलिया (बहुतेक प्रदेश) : दुपारी 01.00
जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया : दुपारी 03.00
चीन, फिलीपिन्स आणि सिंगापूर : संध्याकाळी 04.00
बांगलादेश : संध्याकाळी 06.00
नेपाळ : संध्याकाळी 6:15
भारत आणि श्रीलंका : संध्याकाळी 06:30
पाकिस्तान : संध्याकाळी 07.00
जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि स्पेन : रात्री 11.00
यूके, आयर्लंड, आइसलँड, पोर्तुगाल : सकाळी 00.00