हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शारिक कुरेशी आणि त्याची पत्नी ओनिबा कुरेशी हे दोन वर्षापूर्वी कतारमध्ये हनीमूनवर गेले होते. आणि तिथे बनावट ड्रगच्या प्रकरणात अडकले होते. आता अखेर दोन वर्षांनंतर दोघे पती-पत्नी घरी परतले आहेत. दोघेही बुधवारी मध्यरात्री मुंबईला परतले. ड्रग्स प्रकरणात या जोडप्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण एनसीबीने भारतात या प्रकरणाचा तपास केला आणि तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की, दोघे निर्दोष आहेत. त्यानंतर त्यांना तुरूंगातून सोडण्यात आले.
या दाम्पत्याला तुरुंगात जन्मलेली एक मुलगीही आहे:
हनीमूनसाठी कतारला जाणे इतका भयानक अनुभव असेल, हे शरिक कुरेशी आणि ओनिबा कुरेशी यांना स्वप्नातही वाटले नव्हते. 3 फेब्रुवारी रोजी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. कतारमध्ये, ड्रग प्रकरणात निर्दोष मुक्त करणे जवळजवळ अशक्य मानले जाते. ओनिबा मुंबईहून कतारला आली तेव्हा ती 3 महिन्यांची गरोदर होती आणि तुरूंगातच तिने एका मुलीला जन्म दिला.
काय आहे संपूर्ण प्रकरण:
दोघे हनिमून ला निघाले. दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर दोघांचा शोध घेण्यात आला, तोपर्यंत सर्व काही ठीक होते. यानंतर दोघांच्या पिशव्या स्कॅन झाल्यावर तेथे कस्टम वाला पोहोचला आणि एक बॅग अडविण्यात आली. त्या बॅगमध्ये काही कपडे होते. कपड्यांच्या खाली आणखी एक पिशवी होती जी काकूने तिला दिली होती. ती बॅग उघडली असता त्यात एक पाकिट सापडले, त्यात 4 किलो चरस होते. पिशवीत चरस पाहून त्यांच्या दोन्ही पायाखालची जमीन सरकली. कस्टम आणि दोहा पोलिसांना दोघेही निर्दोष असल्याचे सांगत असतात पण कोणीही त्यांचे ऐकले नाही आणि या दोघांवर गुन्हा दाखल करून तुरूंगात पाठविण्यात आले होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group